Friday, 18 January 2013

size zero कि स्वतःच zero



आजची कुणीही तरुण  मुलगी बघा ती size zero  च्या मागे पळतेय, size zero च्या मागे पळता पळता नकळत स्वतःच झेरो नाही झालो म्हणजे बास. slim - trim दिसण्यासाठी नको नको ते नुसके वापताना दिसतात.
बर्याच जनी dietitian चा सल्ला न घेताच diet सुरु करतात. पणत्यांच्या शरीरावर दूरगामी, मोठे दुष्परिणाम होऊ लागतात. पुढच्या आयुष्यात कामाचा ताण वाढतो. post pregnancy चे आजार त्याच प्रमाणे पुढच्या पिढीला शसक्त बनवण्याची जबाबदारी आताच्या तरुण मुलींवर आहे. व इतर समस्यांना तोंड देण्यासाठी मुलींच्या चांगल्या आरोग्याची नितांत गरज आहे. ते आरोग्य पोषक , संतुलित आहाराशिवाय व व्यायामाशिवाय मिळत नाही, व्यायाम सुद्धा असाच पाहिजे जो, आरोग्य देईल, नाही कि फक्त चरबी कमी करेल. आपल्या भारतात प्रत्येकी ४थी महिला हि osteoporosis ची शिकार आहे हे त्या well educated  मुली नक्कीच जनात असतील. आपण मनुष्य आहोत वस्तू नाही, याचेही भान तेवढेच महत्वाचे आहे.
आणि, एकदा कि नाही आरोग्य चांगले झाले कि, त्वचा व केस यांचेही आरोग्य सुधारते व  सौदर्य प्रसाधनांची गरजच पडत नाही.
तसेच, कामात उत्साह वाटत, कार्यक्षमता वाढते, मनाचेही आरोग्य चांगले राहते. कारण निरोगी शरीर आनंदी आयुष्य देते.

No comments:

Post a Comment